मुंबई : बिग बॅश लिगवर सट्टा, बुकीला अटक | Mumbai Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Betting
क्रिकेट सामान्यावर सट्टा घेणारा अटकेत

मुंबई : बिग बॅश लिगवर सट्टा, बुकीला अटक

sakal_logo
By

क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारा अटकेत भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : ऑस्ट्रेलियामध्ये स्थानिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लिग ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या बुकीला पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिजेश भट्ट असे या बुकीचे नाव आहे.

या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांनी भाईंदर पश्चिम येथील ६० फुटी रस्त्यावरील एका इमारतीवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ब्रिजेश भट्ट याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे असलेल्या स्मार्ट फोनवर काही मोबाईल ॲप्लिकेशन आणि संकेतस्थळे आढळून आली. ज्याच्या मदतीने तो ॲडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामन्यावर सट्टा घेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तीन मोबाईल आणि रोख रक्कम अशी एकूण ४९ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News
loading image
go to top