ऑक्सिजन आणि पाणी पळवणारे महाचोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सिजन आणि पाणी पळवणारे महाचोर
ऑक्सिजन आणि पाणी पळवणारे महाचोर

ऑक्सिजन आणि पाणी पळवणारे महाचोर

sakal_logo
By
ऑक्सिजन आणि पाणी पळवणारे महाचोर शिवसेना व राष्ट्रवादीवर गणेश नाईकांचे अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. १२ : शहरातील नागरीकांना तहानलेले सोडून त्यांच्या हक्काचे पाणी गुपचुप पळवणारे आणि ऑक्सिजन चोरून घेऊन जाणारे महाचोर आहेत, अशा शब्दांत माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घणाघाती टीका केली. एमआयडीसीतील भूखंड लाटण्याचा प्रयत्न केला, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करु, भले जेलमध्ये जावे लागले तरी चालेल असा खरमरीत इशारा नाईकांनी सत्ताधाऱ्यांना दिला. ऐरोलीतील महापालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांत नाईकांनी नाव न घेता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांवर तोफ डागली. मी जर ठरवले, तर आरपारची लढाई करायची माझी क्षमता आहे, पण दुसऱ्याचा अवमान, अपमान व्हावा दुसऱ्याला दुखावले जाऊ नये म्हणून बोललो नाही, असा निर्वाणीचा इशारा देत नाईकांनी भाषणाला सुरुवात केली. या शहराचे पाणी चोरण्याचा प्रयत्न केला गेला. दिघा, ऐरोली एमआयडीसीतील भागातील लोकांना तहाणलेले ठेवून ते पाणी दुसऱ्यांना गुपचुप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नाईकांनी केला.  एखाद्या घरातून वस्तू चोरी करतात तसे, रबाळे एमआयडीसीत ऑक्सिजनची निर्मिती होत असताना दुसऱ्या कोविडच्या लाटेत ऑक्सिजन चोरण्याचा प्रकार झाला, अशा चोरी करणाऱ्यांना महाचोर बोलतात. असा पुनरुच्चार नाईकांनी केला. बोलताना नाईकांनी सांगितले की, आपल्याला कधी दुसऱ्याला अपमानीत करायला आवडत नाही. पण आमच्या समोर नवी मुंबईच्या जनतेची कोणी वाट लावत असेल अशा वेळेस गप्प बसलो, तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही. ------------------------------------------- भले तर आंदोलन करु.. एमआयडीसीने अलिकडे भूखंड विकायला काढले आहे. राज्याने चार एफएसआय मंजूर केले आहे. भविष्यात जेव्हा शहराची वाढ होईल तेव्हा काय करणार? काही ठिकाणी जमिनीखालून फायबर ऑप्टीकल केबल, पाण्याच्या लाईन गेल्या आहेत. अशा जागांवर काही लोकांनी हॉटेल उभारण्याचा घाट घातला असल्याचा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला. एमआयडीसीच्या भूखंडांवर नजर ठेवा, नाही तर हे महाचोर पुन्हा हे भूखंड लाटण्याची संधी सोडणार नाही. त्याकरीता वृक्षा रोपण करा, असे आवाहान नाईकांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच पुन्हा असे वागल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करु, वेळ पडल्यास जेलमध्ये जाऊ पण असा अन्याय सहन करणार नाही. असा इशारा नाईकांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top