शालेय बससाठी कोविडमुळे करमाफी

शालेय बससाठी कोविडमुळे करमाफी

शालेय बससाठी कोविडमुळे करमाफी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ : कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय बुधवारी (ता. १२) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या, तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी वार्षिक कर १०० टक्के माफ करण्यात आला आहे. मात्र स्कूल बस प्रकारातल्या वाहनांनी वरील कालावधीसाठीचा कर भरला असेल तर अशा कराचे महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम १९९८ मधील कलम ९ (४ अ) नुसार आगामी काळात समायोजन करण्यात येईल. ... यापूर्वी स्कूल बसमालकांना सहा महिन्यांची करमाफी दिली होती. त्यानंतर आता एक वर्षाची करमाफी देण्यात आली आहे. करापोटी सुमारे साडेआठ कोटी रुपयांची माफी देण्यात आली आहे. - अविनाश ढाकणे, आयुक्त, परिवहन विभाग. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com