सरकारच्या धोरणावर भाजपची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारच्या धोरणावर भाजपची टीका
सरकारच्या धोरणावर भाजपची टीका

सरकारच्या धोरणावर भाजपची टीका

sakal_logo
By
सरकारच्या धोरणावर भाजपची टीका शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत; आमदारांचे गैरप्रकार माफ मुंबई, ता. १३ ः एकीकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत असे सांगणारे राज्य सरकार दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहारांवर पांघरून घालण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, हा खासा न्याय आहे, अशी टीका भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन संकुलातील अवैध बांधकामावर ठाणे महापालिकेने आकारलेला दंड आणि व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे वित्त विभागाचा विरोध डावलून मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. त्यावर उपाध्ये यांनी ट्वीट करून वरीलप्रमाणे टीका केली आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना कबूल करूनही राज्य सरकार प्रोत्साहन भत्ता देत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतात. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी कोट्यवधी रुपये माफ केले जातात, वा रे उद्धव सरकार, अशी टीका त्यांनी केली आहे. ... सरकारचे उत्पन्न बुडवले एसटी कामगारांनी तडफडून आत्महत्या केल्या तरीही सरकारला पाझर फुटला नाही. पण स्वतःच्या आमदाराच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी थेट मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडले. त्यापायी सरकारचे उत्पन्नही बुडवले, याचे कारण कोणालाही थेट समजण्यासारखे आहे. अनियमित बांधकामे करणारे शिवसेनेचे आमदार असले तर त्यांना सगळे गुन्हे माफ, हेच ठाकरे सरकारचे धोरण आहे, असाही टोला उपाध्ये यांनी लगावला आहे. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top