कांदा, बटाटा, लसूनच्या दरात घसरण, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा, बटाटा, लसूनच्या दरात घसरण,
कांदा, बटाटा, लसूनच्या दरात घसरण,

कांदा, बटाटा, लसूनच्या दरात घसरण,

sakal_logo
By
कांदा, बटाटा, लसणाच्या दरात घसरण घाऊक दर प्रतिकिलो कांदा १८ ते ३० रुपये, बटाटा ८ ते १३ रुपये, लसून १२ ते २८ रुपये वाशी, ता. १३ (बातमीदार) ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा, लसणाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांदा, बटाटा, लसणाच्या दरात घसरण झाली आहे. दरात घट होत असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. एपीएमसी बाजारात जानेवारीपासून नवीन ओल्या लसणाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने उत्पादनही कमी झाले होते. परिणामी लसणाचे दर गगनाला भिडले होते. तीन वर्षांपूर्वी २०० ते २५० रुपयांनी लसूण विकला जात होता. मात्र २०१९ मध्ये लसणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने दर प्रतिकिलो ३० रुपये होते. मात्र गतवर्षी व यंदा लसणाचे दर चढेच होते. घाऊक बाजारात मिळणारा प्रतिकिलो लसूण ८० ते १२० रुपयांनी उपलब्ध होता. मात्र आता आवक वाढल्‍याने दरात १०० रुपयांनी घसरण झाली असून दर १२ ते २८ रुपयांवर आले आहेत. सध्या मध्य प्रदेश, गुजरातमधून नवीन लसणाच्या १२ ते १५ गाड्यांची आवक होत आहे. अवकाळी व अतिवृष्टीमुळे कांदा हा चाळीमध्येच सडल्‍याने कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. कांद्याची आवक कमी झाल्यामुळे दरात वाढ होत मुंबई कृषी उत्पन्न बाजारातील घाऊक बाजारात कांद्याचे दर नोव्हेंबरमध्ये ५० ते ६० रुपयांवर पोहचले होते. त्यामुळे कांद्याने डोळ्यात अक्षरशः पाणी आणले होते. मात्र आता नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे; तर चाळीत सडणारा कांदाही बाजारात दाखल झाला आहे. एपीएमसीत नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली येथून कांद्याच्या १०० ते १२० गाड्या दररोज येत आहेत. आता कांदा १८ ते ३० रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे थाळीतून हद्दपार झालेला कांदा पुन्हा दिसू लागला आहे. बटाट्याचे देखील उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दरात घसरण झाली आहे; तर जुना बटाट्याच्या स्टॉक देखील वाढला आहे. त्यामुळे बटाट्याच्या बाजारात ५० ते ६० गाड्या दाखल होत आहे. नवीन बटाटा उत्तर प्रदेश, हरियाणा, आग्रा येथून बाजारात येत आहे. आवक वाढल्यामुळे बटाट्याची देखील घसरण झाली असून बाजारात ८ ते १३ रुपये किलोने मिळत आहे. चौकट कांदा, बटाटा, लसूणच्या दरात घसरण झाली आहे. मध्यंतरी कांद्याने डोळ्यात पाणी आणले होते. मात्र अवकाळी पावसामुळे चाळीत ठेवण्यात आलेला कांदा खराब होऊ लागल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात चाळीतील कांदा येऊ लागला आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. लसूण, बटाट्याची देखील आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. - अशोक वाळूंज, व्यापारी. चौकट नोव्हेंबर २०२१ जानेवारी २०२२ कांदा २५ -३५ १८ - ३० बटाटा १४ -२४ ८ - १३ लसूण ३० - ७० १२ - २८
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top