Exam
Exam sakal media

बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; वाचा सविस्तर

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च महिन्यात होणाऱ्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. यामध्ये ७ मार्चला होणारी ‘अर्धमागधी’ या विषयाची परीक्षा ८ मार्चला होणार आहे. इतर कोणत्याही विषयांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला नसल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. (Maharashtra HSC exam 2022 updated timetable)

Exam
तिसऱ्या लाटेचा धोका कायम; राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावला

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची लेखी परीक्षा ही ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार असून त्यासाठीचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे; मात्र ७ मार्चला होणाऱ्या ‘अर्धमागधी’ या विषयाच्या परीक्षेत अंशत: बदल करून सुधारित वेळापत्रक मंडळाने जारी केले आहे. उर्वरित विषयांच्या परीक्षा नियमित वेळेत होणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com