वसई-विरारमध्ये कचरा कोंडी

वसई-विरारमध्ये कचरा कोंडी

वसई-विरारमध्ये कचरा कोंडी डिझेल संपल्याने वाहने ठप्प वसई, ता.१३ (बातमीदार) ः डिझेलअभावी कचराभूमीवर कचरा टाकणारे तीन ते चार पोकलेन काम करू शकत नसल्याने ( ता. १३ )वसई पूर्वेला सातिवली परिसरात वसई-विरार शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधीने नागरिक हैराण झाले असून महापालिकेने यावर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचारी करत आहेत. वसई-विरार शहरात रोज ६५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. वाहनांतून वसई पूर्वेकडील सातिवली, भोईदापाडा येथे जमा केला जातो, त्यानंतर पोकलेनच्या साह्याने हा कचरा पुढे टाकला जातो. मात्र डिझेल संपल्याने पोकलेनचे काम बंद करण्यात आल्याने शहरातील जमा केलेल्या कचऱ्याची वाहने ही अडकून पडली आहेत. एकीकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी कोणतीच तरतूद महापालिकेकडून होत नसताना पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारलेल्या आयुक्त अनिल पवार यांच्यासमोर डोकेदुखी उभी राहिली आहे. पोकलेनचे काम कधी सुरू होणार व आमच्या वाहनातील कचरा कधी खाली होणार याची प्रतीक्षा चालक करत आहेत; तर दुसरीकडे येथील नागरिक देखील आक्रमक झाले असून कचऱ्याच्या गाड्या लवकर खाली करा, अशी मागणी करू लागले आहेत. डिझेलसाठी भिक मांगो आंदोलन वसई-विरार पालिका शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत नसल्याने येथील ग्रामस्थांना त्रास होतो. त्यातच डिझेलमुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. महापलिकडे पैसा संपला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने डिझेलसाठी भिक मांगो आंदोलन सुरू करणार, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारी व पंचायत समितीचे माजी सदस्य काकासाहेब मोटे यांनी दिली. शहरातील कचरा वाढणार जर डिझेलची समस्या अशीच राहिली तर शुक्रवारी वसई-विरार शहरातील कचरा जमा करणारी वाहने येणार नाहीत व शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण होऊन दुर्गंधीचा सामना करदात्यांना करावा लागण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com