सेन्सेक्समध्ये किंचित वाढ

सेन्सेक्समध्ये किंचित वाढ

सेन्सेक्समध्ये किंचित वाढ मुंबई, ता. १३ : जागतिक परिस्थिती अनुकूल असल्याने आज भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी किंचित वाढले. सेन्सेक्स ८५.२६ अंश; तर निफ्टी ४५.४५ अंशांनी वाढला. अमेरिकेतील चलनवाढीचा तपशील समाधानकारक असल्याने आज जागतिक शेअरबाजारांमध्ये समाधानकारक वातावरण होते. भारतीय शेअर बाजारांमध्येही धातू आणि औषधनिर्मिती कंपन्यांचे शेअर वाढले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,२३५.५० अंशांवर; तर निफ्टी १८,२५७.८० अंशांवर स्थिरावला. टाटा स्टील टक्केवारीचे शेअर सर्वात जास्त म्हणजे साडेसहा टक्क्यांनी (७३ रुपये) वाढून १,२२० रुपयांवर बंद झाले. ४५ रुपयांनी वाढलेला लार्सन अँड टुब्रोचे शेअर २,०१८ रुपयांवर स्थिरावले. बायबॅक जाहीर केलेला टीसीएसचा शेअरदेखील ४० रुपयांनी वाढून ३,८९७ रुपयांवर गेला. दुसरीकडे आज विप्रो टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे सहा टक्के (४१ रुपये) घसरून ६४९ रुपयांपर्यंत आला. एशियन पेंट, एचडीएफसी बँक, इंडसइंड व कोटक बँक, मारुती, एचसीएल टेक हे शेअरही घसरले. पेटीएम (बंद भाव १,०३१ रु.) टाटा टेलीसर्व्हिसेस महाराष्ट्र (२६१.९०) यांचीही घसरण आज सुरूच राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com