दुप्पट परताव्याच्या नावाने ३० लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुप्पट परताव्याच्या नावाने
३० लाखांची फसवणूक
दुप्पट परताव्याच्या नावाने ३० लाखांची फसवणूक

दुप्पट परताव्याच्या नावाने ३० लाखांची फसवणूक

sakal_logo
By
दुप्पट परताव्याच्या नावाने ३० लाखांची फसवणूक धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ ः ३० लाखांची गुंतवणूक केल्यास तीन वर्षांत दामदुप्पट परतावा देतो, असे सांगत एका क्रेडिट सोसायटीने पत्रकाराची फसवणूक केल्याची घटना धारावी परिसरात घडली आहे. धर्मेंद्रप्रताप रघुराजन सिंग असे या पत्रकाराचे नाव आहे. याप्रकरणी महेश क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडविरोधात धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धर्मेंद्रप्रताप सिंग हे एका हिंदी दैनिकात कार्यरत होते. २०१९ मध्ये त्यांची नोकरी गेली. धारावीतल्या एका मित्राच्या कार्यालयात त्यांची सुरेंद्रकुमार मौर्या नामक व्यक्तीशी ओळख झाली. धर्मेंद्रप्रताप सिंग यांनी त्यांच्याकडे घर विकल्याने ३० लाख रुपये आहेत, ते मुलीच्या लग्नासाठी ठेवायचे आहेत, असे बोलताना सांगितले. ही बाब ऐकून सुरेंद्रकुमारने मुलीच्या लग्नाला वेळ आहे, तोपर्यंत ते पैसे माझ्या भावाच्या क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवा, चांगला परतावा मिळेल असे सांगितले. धर्मेंद्रप्रताप सिंग यांनीही मुलीच्या लग्नाला वेळ आहे आणि सध्या पैशांची गरजही नाही म्हणून ते पैसे गुंतवायला तयार झाले. त्यानंतर सुरेंद्र कुमारने धर्मेंद्रप्रताप आणि महेश मौर्या यांची भेट घालून दिली. ३० लाख गुंतवणूक केल्यास दरमहा ६० हजारांचे व्याज तुम्हाला मिळेल, असे प्रलोभन मौर्याने धर्मेंद्र यांना दाखवले. त्यानुसार धर्मेंद्र यांनी टप्प्याटप्प्याने क्रेडिट सोसायटीत ३० लाखांची गुंतवणूक केली. दरम्यान, काही दिवसांनी धर्मेंद्र यांनी पैशांची गरज असल्याने सुरेंद्रकुमारशी संपर्क साधला. सुरेंद्रकुमार फोन उचलत नव्हता; तर महेश मौर्याचा मोबाईलही बंद होता. धर्मेंद्र यांनी महेश क्रेडिट को-ऑपच्या कार्यालयात धाव घेतली असता मौर्या हा सर्वांचे पैसे घेऊन पळून गेल्याचे समोर आले. त्यानुसार धर्मेंद्र यांनी धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top