MLA Dilip lande
MLA Dilip landegoogle

शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना दिलासा

शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना दिलासा, निवडणुकीला विरोध करणारी याचिका नामंजूर

मुंबई : शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे (Dilip lande) यांच्या विधानसभा निवडणुकीला (Assembly election) विरोध करणारी काँग्रेस उमेदवार नसीम खान (Naseem khan) यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) गुरुवारी नामंजूर केली. २०१९ मध्ये झालेल्या चांदीवली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत लांडे विजयी झाले आहेत; तर खान यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव झाला होता. लांडे यांनी निवडणुकीत गैरप्रकार करून विजय मिळवला, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. निवडणुकीदरम्यान खान यांच्या संबंधित एक आधारहिन कथित व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायर करण्यात आला. (Shivsena mla dilip lande gets relief in assembly election matter)

MLA Dilip lande
कोलकाता : नातेवाईकानेच केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या!

तसेच, प्रचार कालावधी संपल्यानंतरही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलीप लांडे यांचा प्रचार केला होता, असे आरोप याचिकेत करण्यात आले होते. याचिकेला लांडे यांच्या वतीने विरोध करण्यात आला. आरोपांबाबत कोणताही ठोस पुरावा नसीम खान यांनी दाखल केलेला नाही. तसेच, ज्या व्हिडीओबाबत याचिकेत आरोप केले आहेत, त्याचा शिवसेनेशी काय संबंध हेच स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद लांडे यांच्या वतीने ॲड. शार्दुल सिंह यांनी केला.

न्या. संदीप शिंदे यांच्यापुढे याचिकेवर सुनावणी झाली. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८३ नुसार वास्तविक, ठोस पुरावे दाखल केले नाहीत; तर निवडणूक याचिका मंजूर होऊ शकत नाही. फेक व्हिडीओ लांडे यांनी व्हायरल केला, याबाबत खान यांनी पुरेसे स्पष्टीकरण केले नाही. त्यामुळे हा आरोप अनिश्चित आणि आधारहिन आहे. व्हिडीओद्वारे मतदारांची दिशाभूल केली, अशी केवळ शक्यता वर्तविणे हा काही ठोस आधार होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com