ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन

ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन

sakal_logo
By
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. १४ : ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्‍चात मुलगा, नातू आणि पणती असा परिवार आहे. घंटाळी विष्णू निवास येथे ते वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कचराळी येथे फेरफटका मारण्यास गेले होते. त्यानंतर ते घरी गेले असता त्यांना त्रास जाणवू लागला. काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. १९३४ मध्ये जन्मलेले वसंत नारायण ऊर्फ योगीदास मराठे हे १९५६ पासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच त्यांचा शिवसेनेत सहभाग होता. १९६७ च्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. दोन वर्षे नगराध्यक्ष आणि सहा वर्षे नगरपालिकेचे सभासद राहिले. १९९९ पासून श्रीमद् भगवद्‍गीतेचा प्रचार आणि प्रसार हेच त्यांचे अखेरपर्यंत जीवितकार्य राहिले. वसंत मराठे यांचे ठाण्यासाठी असलेले योगदान हे निश्च‍ितच आम्हाला यापुढेही प्रेरणादायी राहील, अशी महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top