मुंबईतील नवीन रुग्णांमध्ये
आणखी घट

मुंबईतील नवीन रुग्णांमध्ये आणखी घट

मुंबईतील नवीन रुग्णांमध्ये आणखी घट सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १४ : मुंबईतील बाधित रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून दैनंदिन रुग्णसंख्या आज ११,३१७ पर्यंत खाली आली. कालच्या तुलनेत आज तब्बल २,३८५ ने रुग्णसंख्या घटली. आज सापडलेल्या रुग्णांपैकी ९,५०६ (८४ टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. नवीन रुग्णांपैकी ८०० रुग्णांना (७.०६ टक्के) रुग्णालयांत दाखल करण्यात आले. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ६,४३२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर १.७४ टक्के झाला आहे; तर रुग्ण  दुपटीचा दर ३९ दिवस आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांचा आकडा आज ८४,३५२ पर्यंत कमी झाला आहे.  मुंबईत रुग्ण दगावण्याचे प्रमाण किंचित वाढले असून आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांचा आकडा १६,४३५ वर पोचला आहे. आज ५४,९२४ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत १,४५,१०,४३८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज २२,०७३ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत ८,७७,८८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.    आज सापडलेल्या बाधित रुग्णांपैकी ८८ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत २,८२४ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत ९,८१,३०६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६,७७,७३४ (६९.०६ टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत. एकूण उपलब्ध रुग्णशय्यांपैकी १६.८ टक्के रुग्णशय्या भरल्या आहेत.  सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६५ इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com