सुगरण स्पर्धेतील सहभागी महिलांना भेटवस्तू वाटप

सुगरण स्पर्धेतील सहभागी महिलांना भेटवस्तू वाटप

सुगरण स्पर्धेत विक्रमगडमधील सहभागी महिलांना भेटवस्तू वाटप विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) ः सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या सुगरण स्पर्धेला विक्रमगडमधील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विक्रमगड नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष नीलेश पडवळे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वच महिलांना सामाजिक कार्यकर्ते नितीन वाडेकर, प्रकाश भानुशाली, माजी नगरसेविका अर्चना लोहार यांच्या उपस्थितीत भेटवस्तू देण्यात आल्या. स्पर्धेत विक्रमगड शहरातील प्रचिती प्रशांत भानुशाली, दर्शना संजय भानुशाली, संगीता प्रदीप औसरकर, अंकिता विजय व्यापारी, संगीता विनोद लोहार, सिद्धी आदित्य औसरकर, स्नेहल योगेश भानुशाली, सपना अनिल भानुशाली, दीपमाळा निसाळ, वर्षा मनीष भानुशाली, शीतल संजय भानुशाली, करुणा किरण शेलार, मनीषा मनिष गभाळे, आदिती अशोक बांबेरे, दर्शना संतोष गायकवाड यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com