वसार शाळेत रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसार शाळेत रक्तदान शिबिर
वसार शाळेत रक्तदान शिबिर

वसार शाळेत रक्तदान शिबिर

sakal_logo
By
वसार शाळेत रक्तदान शिबिर कल्याण, ता. १५ ः जीवन गौरव परिवार तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनेल, महाराष्ट्र राज्य केंद्र यांच्यातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत सावित्रीमाई व जिजाऊ माता महोत्सवा अंतर्गत वसार येथे जिल्हा परिषद शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्‍घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप फुलोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी सेंट्रल रुग्णालयाच्या उल्हासनगरातील डॉ. उषा ससाणे, डॉ. बागडे, पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल वायले, शाखाप्रमुख अशोक म्हात्रे उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रमोद पाटील, जनसेवा ग्रुप अध्यक्ष रवी वायले, जीवन मढवी, राजेश वायले यांनी सहकार्य केले. या उपक्रमासासाठी विजया मदन सोळसे तसेच सविता देशमुख यांनी रांगोळी व सजावट केली. कल्पना सोनवणे, रोहिणी राकेश पाटील, प्रफुल्ल गडकरी, मेहुल कोरडे सर यांनी स्वागत व इतर व्यवस्था पाहिली. या उपक्रमाची संकल्पना, आयोजन मोहिनी पंडित बागूल यांची होती.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top