श्रीवर्धनमध्ये शिवसेना - राष्ट्रवादीत वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीवर्धनमध्ये शिवसेना - राष्ट्रवादीत वाद
श्रीवर्धनमध्ये शिवसेना - राष्ट्रवादीत वाद

श्रीवर्धनमध्ये शिवसेना - राष्ट्रवादीत वाद

sakal_logo
By
होर्डिंग्ज फाडल्याने शिवसेना-राष्ट्रवादीत वाद दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल श्रीवर्धन, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील वाकळघर, नागलोली, वावेपंचतन परिसरात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या विकासकामांचे लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले आहेत. होर्डिंग्ज फाडल्याने या वादाची ठिणगी पडली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावरून शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत दिघी सागरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या श्रीवर्धनमधील वाकलघर, नागलोली, वावेपंचतन या गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. या योजना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केल्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तसे होर्डिंग्ज त्यांनी त्या परिसरात लावले होते. मात्र, शुक्रवारी वाकलघर येथील होर्डिंग्ज काही अज्ञातांनी फाडून टाकल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. ही माहिती सर्वत्र पसरली आणि गावागावांतून शिवसैनिक एकत्र येत त्यांनी संशयित इसमांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना उपतालुकाप्रमुख अरुण शिगवण यांनी हे कृत्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. तशी तक्रार शिगवण यांनी दिघी सागरी पोलिस ठाण्यात केली आहे. तक्रारीमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांच्या सांगण्यावरून संदेश गुजर, संतोष भोगल, सुनील चव्हाण, संदेश काते, संजय तटकरे, विजय पाडावे, सचिन विचारे यांनी वाकलघर येथील होर्डिंग्ज फाडून मोडतोड केल्याचे म्हटले आहे. या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top