मराठी पाट्या असाव्यात पण हिंदी इंग्रजी भाषेतील पाट्यां ना विरोध नको - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मराठी पाट्या असाव्यात पण हिंदी इंग्रजी भाषेतील पाट्यां ना विरोध नको - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

हिंदी, इंग्रजी पाट्यांना विरोध नको! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ : दुकानांवर मराठी भाषेतील नावाच्या पाट्या असाव्यात; मात्र त्यासाठी राष्ट्रभाषा हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्यांना विरोध करणे योग्य नाही. तसेच मराठी पाट्यांचा आकार आणि इंग्रजी भाषेतील पाट्यांचा आकार यावरून भाषिक भेदभाव करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. याआधी राज ठाकरे यांनी दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात, याचा आग्रह धरला. आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मराठी पाट्यांचा विषय आणला असून त्यासाठी राज्य सरकारने तसा कायदा केला आहे; मात्र दुकानांवरील पाट्यांचा आकार मोठा केल्याने मराठी भाषेला मोठेपणा मिळणार नसून मराठी भाषा मुळातच मोठी आणि श्रेष्ठ आहे, असे रामदास आठवले म्हणाले. आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे; मात्र मुंबईत येणारे परप्रांतीय नागरिक; परदेशी पर्यटक यांना मराठीसोबत इंग्रजी पाटी सोयीची ठरते. इंग्रजी पाटी नसेल तर मुंबईत व्यापारातून जी मोठी आर्थिक उलाढाल होते त्यावर याचा परिणाम होईल. त्यामुळे मराठीसोबतच इंग्रजी, हिंदी सर्व भाषेतील पाट्या असाव्यात. त्यातील आकारावरून शासनाने भेदभाव करू नये, असे आवाहन आठवले यांनी केले. सरकारने विधायक कामे करावीत! मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, मराठी माणसांच्या आर्थिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासनाने विधायक कामे करावीत. केवळ पाट्यांसाठी आटापिटा करण्याऐवजी मुंबईत मराठी माणसांच्या मालकीची दुकाने कशी वाढतील, याकडे सरकारने अधिक लक्ष द्यावे, असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com