ATM robbery
ATM robbery sakal media

स्टेट बँकेची तिजोरी फोडणारा नवी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

नवी मुंबई पोलिसांकडून आरोपी अकोला पोलिसांच्या स्‍वाधीन

नवी मुंबई : अकोला येथील स्टेट बँकेतील (State bank of India) तिरोजी गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करून पळालेल्या दोन आरोपींना (two thief arrested) नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Navi mumbai police) खारघरयेथील पेठपाडा येथून अटक केली आहे. सौदागर फाजूल शेख (३६) व शेरशहा रब्बुल शेख (४५) अशी त्‍यांची नावे असून त्‍यांना अकोला येथील एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सौदागर व शेरशहा या दोघांनी गत २५ डिसेंबर रोजी मध्यरात्री अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील स्टेट बँकेचे ग्रील तोडून बँकेत प्रवेश केला होता. (Navi mumbai crime branch police arrested two thief in state bank atm robbery)

 ATM robbery
पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे - दादा भुसे

त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी रिकाम्या हाती पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाल्याने अकोला येथील एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्हीवरून आरोपींचा शोध सुरू केला होता. आरोपी खारघर येथील पेठपाडा भागात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ ला मिळाली होती. त्‍यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक निरीक्षक नीलेश पाटील व त्यांच्या पथकाने रविवारी पेठपाडा भागात सापळा लावला.

यावेळी संशयास्पदरीत्या फिरणार्‌या सौदागर शेख व शेरशहा शेख या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. चौकशीत त्‍यांनी अकोला येथील स्टेट बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना पुढील कारवाईसाठी अकोला येथील एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.

सराईत गुन्हेगार पकडण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध राज्यात गुन्हे दाखल असल्याचे आढळले. यातील सौदागर शेख याच्यावर पश्चिम बंगाल येथील इंग्लिश बझार व माणिक चौक पोलिस ठाण्यात जबरी लूट, आर्म ऍक्ट, तसेच बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com