इटर्नल्स
इटर्नल्स Sakal

इटर्नल्स : मनोरंजनाची खिचडी!

१० हिरो, ७ हजार वर्षांचा इतिहास असणारी कथा, एक देव आणि अनेक प्राण्यांसारखे दिसणारे व्हिलन.

१० हिरो, ७ हजार वर्षांचा इतिहास असणारी कथा, एक देव आणि अनेक प्राण्यांसारखे दिसणारे व्हिलन. एवढं सगळं एकत्र, ‘इटर्नल्स’ (Internals) ह्या एका फिल्ममध्ये दाखवणं प्रचंड जोखमीचं काम होतं. पण मार्व्हलने हे आधीही करून दाखवलं आहे. ‘इन्फीनिटी वॉर’ (Infinity War) आणि ‘एंडगेम’चा आवाकाही असाच प्रचंड मोठा होता. अत्यंत राजकीय ‘कॅप्टन अमेरिका’, अवकाशातील हिरो ‘गार्डियंस ऑफ गॅलॅक्सी’ (Gardiance Of Galexy), किशोरवयीन मुलगा ‘स्पायडर-मॅन’ (SpiderMan)अशी कुठलीही पात्रं त्यात एकत्र आली होती. आणि तरीही ते सिनेमे चांगले झाले. (The Milestone Movies)

आजवर अनेक एक्स-मेन सिनेमांनी हे करून दाखवलं आहे. मग हेच मार्व्हलला परत जमायला हरकत नव्हती. पण प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळतं ते चित्र थोडं असमाधाकारक आहे. इटर्नल्समध्ये कुठल्याच पात्राला व्यवस्थित वेळ किंवा न्याय मिळाला असं वाटत नाही. ती पात्रं कुठल्या स्वभाव विशेषणानिशी आपल्या समोर उभी करायची आहेत तेच आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ही कथा १० अशा पात्रांची आहे, जी गेली सात हजार वर्षं पृथ्वीवर राहत आहेत. आणि त्यांचं अमरत्व लपवत आहेत. त्यासोबत येणारे त्यांचे अनेक अनुभव आहेत.

इटर्नल्स
ज्येष्ठ विधीतज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन

पण सिनेमा ते पूर्णपणे दाखवूच शकत नाही. मार्व्हलच्या विनोदी संवादांच्या फॉर्म्युल्यात तो अडकून पडतो. आणि ह्या सिनेमकडून तशी जास्तीची अपेक्षा ठेवली जाते कारण तो क्लोई झाओसारख्या स्वतंत्र, प्रवासी सिनेमे बनवणाऱ्या लेखिकेने दिग्दर्शित केला आहे. सिनेमाच्या प्रवासात आपल्याला ह्या दहा जणांचा इतिहासातला प्रवास दिसतो. त्यांची एकमेकांसोबतची भांडणं, हेवेदावे, विश्वास-अविश्वास सर्व काही दिसतं. पण त्यातल्या कुठल्याच गोष्टीला गरजेचा असणारा वेळ दिला आहे असं वाटत नाही. कथेत ही सर्व पात्रं पुढे आणण्यासाठी सर्सीचा एक प्रवास ह्या सर्वांना जोडणारा एक धागा आहे. पण सतत पुढे-मागे होत राहणारा काळ कुठलंही एक कनेक्शन तयार होऊ देत नाही. मार्व्हल सिनेमात असणारे दोन सगळ्यात मोठे प्रॉब्लेम इथे आणखी जास्त स्पष्ट होत जातात. ते म्हणजे एकच एक व्हिलनचं नसणं.

आणि दूसरा म्हणजे शेवटचा खूप मोठा सीजीआय मारधाडपट. इथे इटर्नल्सना दिलेलं मुख्य काम आहे ते म्हणजे डेव्हियंट्सना मारणं. पण हे डेव्हियंट्स कोण आहेत, ते असे डायनॉसोरसारखे का दिसतात? ह्या कशाचीच उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळे इटर्नल्सच्या लढ्यात आपण कधीच त्यांच्यासोबत उभे राहत नाही. आणि इथे व्हिलन मुळात कसल्याही फिलॉसॉफीशिवाय आहे असं वाटत राहतं. दुसरीकडे शेवटाला जेंव्हा ह्या व्हिलनचं स्वरूप समोर येतं तेव्हाही ते इतक्या घाईगडबडीत समजावलं जातं की आपण कोणाच्या बाजूने उभं राहायचं आहे किंवा दहापैकी जे हिरो ज्या बाजूला जात आहेत ते का जात आहेत हे कळण्याआधीच मारामारी चालू झालेली असते.

इटर्नल्स
घराला बाहेरून कडी लावून गेली होती 'ती'; खडकवासला धरणात आढळला मृतदेह

बरं ह्यात काही नाविन्यही नाहीये. कारण तिथे जो परिस्थितिचा पलटवार होतो तो कॅप्टन मार्व्हलमध्ये आधी पाहिला आहे. किंवा सगळ्या हिरोंचं युनि-माईंडने एकत्र येणं हेही ‘गार्डियंस ऑफ गॅलॅक्सी’मध्ये होऊन गेलंय. पण अर्थात हा सिनेमा काही जस्टीस लीग किंवा सुसाईड स्क्वाडइतका वाईट नव्हे. क्लोई झाओचे प्रयत्न प्रामाणिक आहेत हे वेळोवेळी दिसत राहतं. प्रत्येक पात्राचा विचार पोहोचत नसला तरी तो केलाय हे जाणवतं. शूटिंगच्या जागा, त्यांचं फ्रेमिंग अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे. जगभरातील अनेक वर्णांचे अभिनेते/अभिनेत्री इथे एकत्र आहेत. त्यात अगदी लहान मुलीपासून ते मुकबधीर अभिनेत्रीचाही समावेश होतो.

सिनेमाचं आर्ट वर्क प्रचंड सुंदर झालं आहे. त्यात अनेक संस्कृतींचा मिलाप आहे. (ह्यातून संस्कृतींचा जन्म झाला असेल, अशा आशयाचं ते डिझाईन आहे.) सलमा हायेक, अँजेलिना जोली अशा जुन्या स्टार्सपासून ते रिचर्ड मॅडेन, किट हॅरिंगटनसारखे नवे स्टार्स इथे एकत्र आहेत. अशा अनेक जमेच्या बाजुही सिनेमात आहेत. पण आजही अनेक सुपर हिरोंना एकत्र आणताना सिनेमाच्या फिलॉसॉफीशी एकजीव राहणारा, त्या जातीचा इतिहास दाखवणारा सिनेमा म्हटलं की कुठल्याही मार्व्हल सिनेमाच्या आधी मला पहिल्या आणि दुसऱ्या एक्स-मेन सिनेमांचीच आठवण येते. ती व्यवस्थित मल्टीकास्टची, प्रत्येकाच्या कथेची चांगली जमलेली भट्टी होती. मार्व्हल अजून मनोरंजनाची खिचडीच बनवतंय.

-सुदर्शन चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com