crime
crime sakal

तब्बल १०० मोबाईल जप्त ; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे : गेल्या काही दिवसांत चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपन्यांचे तब्बल १०० मोबाईल फोन जप्त (100 Mobile phone seized) करण्याबरोबरच दोन गुन्हे उघडकीस आणण्यात ठाणे गुन्हे शाखेला (Thane crime branch) यश आले आहे. तसेच याप्रकरणी दोघांना अटक केली असून हे मोबाईल सामान्य लोकांना विक्री करून वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली. काही दिवसांमध्ये ठाणे शहरात मोबाईल चोरीच्या (Mobile robbery) घटनेत वाढ झाली आहे. (Thane crime branch seized hundred mobile phone in robbery cases)

 crime
मुंबई : नॅशनल पार्कमधील बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

त्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोबाईल जबरी चोरी पथक स्थापन केले. या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास करून त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. याचदरम्यान या पथकाने वेगवेगळ्या कंपन्यांचे १०० मोबाईल आणि २ गुन्हे उघडकीस आणताना दोघांना बेड्या घातल्या. तसेच त्या दोघांना संबंधित पोलिस ठाण्यात वर्ग केले. त्याचबरोबर आणखी काही मोबाईलचा अजूनही शोध घेतला जात आहे. तसेच जप्त केलेले मोबाईल हे सामान्य लोकांना विक्री करून वापरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलिस अंमलदार राजेंद्र काठोळे, अनिल पाटील, शशिकांत भदाणे, नामदेव मुंडे, रोशन जाधव, सागर सुरळकर, हुसेन तडवी या पथकाने केली. मोबाईल घेताना चौकशी करून घ्यावी मोबाईल चोरी झाला असल्यास तत्काळ जवळील पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. तसेच प्रवासात अथवा रस्त्याने मोबाईल चोरी जाणार नाही अथवा गहाळ होणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच कोणी कमी किमतीमध्ये मोबाईल विक्री करत असल्यास त्याची शहानिशा करून खरेदी करावे अन्यथा पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com