Farmer
Farmersakal media

ठाणे : हजारो शेतकरी किसान सन्मान योजने पासून वंचित

तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली पिळवणूक

टिटवाळा : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील हजारो शेतकरी पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान योजनेपासून (Kisaan sanman yojana) वंचित राहिले आहेत. या योजनेसाठी असणाऱ्या एनआयसी कंपनीच्या पोर्टलमध्ये (NIC company portal) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जानेवारीमध्ये योजनेतील रक्कम ही बँक खात्यात (Bank Account) जमा होऊ शकली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर व मुरबाड तालुक्यातील दोन लाखांहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत.

Farmer
केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक; पुज्जापुरा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल २६२ कैद्यांना बाधा

त्यांनाही तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी वर्षभर तहसील कार्यालयात चकरा मारत असून त्यांनाही संबंधित वेबसाइटचा पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगून वारंवार परत पाठविले जात आहे. ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयात एनआयसी कंपनीने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यांना कल्याण तालुक्यातील नायब तहसीलदार यांनी वारंवार संपर्क करूनही कार्यालयाच्या वापरासाठी असणारा ओटीपी देण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे खाते सुरू झाले नाही.

हीच स्थिती भिवंडी व शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील आहे. शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्यासाठीच्या या योजनेचा नियमितपणे लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीची सूर आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी वर्षभर कल्याण तहसीलदार कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र येथील अधिकारी फक्त पोर्टल बंद आहे, हेच उत्तर देतात. - हिराजी बुटेरे, शेतकरी पोई, गाव.

शेतकऱ्यांसाठीची ही योजना त्वरित सुरू व्हावी, पोर्टलचा तांत्रिक बिघाड दूर व्हावा यासाठी रोजच संबंधित आधिकाऱ्यांशी संपर्क करत आहे. - विशे, नायब तहसीलदार.

पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड नसून या योजनेत बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेऊ नये यासाठी स्वतंत्र मेल आयडी संबंधित तहसील कार्यालयांना करण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच एनआयसी कंपनी पोर्टलमधील त्रुटी दूर करेल. - नरेंद्र भामरे, अधिकारी, एनआयसी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com