मुंबईत ८९ टक्के ओमिक्रॉनचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत ८९ टक्के ओमिक्रॉनचे
मुंबईत ८९ टक्के ओमिक्रॉनचे

मुंबईत ८९ टक्के ओमिक्रॉनचे

sakal_logo
By
मुंबईत ८९ टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २४ : ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असून मुंबईत तब्बल ८९ टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट ओमिक्रॉनची असल्याचे पालिकेच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आठव्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे मुंबई क्षेत्राबाहेरील होते. पालिका क्षेत्रातील २८० नमुन्यांपैकी ८९ टक्के अर्थात २४८ नमुने हे ओमिक्रॉन या उपप्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले. ८ टक्के अर्थात २१ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ या उपप्रकाराने; तर उर्वरित सुमारे ३ टक्के अर्थात ११ नमुने हे इतर उपप्रकारांचे असल्याचे आढळून आले आहे. या ११ नमुन्यांपैकी २ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उपप्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहेत. ... बाधित वयोगट ८ व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २८० रुग्णांपैकी ३४ टक्के अर्थात ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. २८ टक्के म्हणजेच ७९ रुग्ण हे ४१ ते ६९ या वयोगटातील आहेत. २५ टक्के म्हणजेच ६९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ८ टक्के म्हणजेच २२ रुग्ण हे ० ते २० या वयोगटातील; तर ५ टक्के म्हणजे १४ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. २७३ रुग्ण लसवंत नाहीत २८० पैकी ७ रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले; तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. ... लसवंत बाधित लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १७४ रुग्णांपैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली, तर १५ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. ... ७६ रुग्ण रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांपैकी ९९ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ७६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले; तर १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि ५ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. ...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top