जूचंद्र येथे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जूचंद्र येथे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स होणार
जूचंद्र येथे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स होणार

जूचंद्र येथे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स होणार

sakal_logo
By
जूचंद्र येथे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारा कन्हैया भोईर यांची मागणी विरार, ता. ३१ (बातमीदार) ः वसईच्या पूर्वकडील प्रभाग समिती जी अंतर्गत नायगाव (पूर्व) भागाचा झपाट्याने नागरीकरण होत असून लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे; परंतु इतकी मोठी लोकसंख्या असूनही या ठिकाणी महापालिकेचे एकही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा सुसज्ज खेळाचे मैदान नाही. यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती कन्हैया भोईर यांनी नायगाव पूर्वेकडील जूचंद्र येथे अत्याधुनिक स्पोर्टस् कॉम्प्लेक्सची मागणी महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. यासाठी त्यांनी सन २०१५ पासून सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. नायगाव पूर्वेत मौजे जूचंद्र येथे सर्व्हे क्र. ३८९/४ ही एकूण ३६० गुंठे (तब्बल ९ एकर) ही जागा महापालिकेने सार्वजनिक लोकोपयोगी उपक्रमाकरिता आरक्षित केली आहे. जागेमध्ये अद्ययावत सोई-सुविधांसह नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारून त्यामध्ये बास्केटबॉल, टेनिस क्रिकेट, स्वीमिंग पूल, हायटेक जिम, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बॉक्स क्रिकेट, क्रिकेट टर्फ, बॅडमिंटन, इनडोअर गेम्स व इतर सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची विनंती केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top