वसई विरार शहरात घनवन निर्मितीचा महापालिकेचा ध्यास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई विरार शहरात घनवन निर्मितीचा महापालिकेचा ध्यास
वसई विरार शहरात घनवन निर्मितीचा महापालिकेचा ध्यास

वसई विरार शहरात घनवन निर्मितीचा महापालिकेचा ध्यास

sakal_logo
By
वसई-विरार पालिका उभारणार मियावाकी वन पर्यावरण समतोलासाठी उचलले पाऊल वसई, ता. ३१ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून रोपांची लागवड केली जाते. शहरातील उद्यानात देखील हा प्रयोग केला जातो. वाहनांची वाढती संख्या, कचरा व अन्य प्रकारे प्रदूषण निर्माण होते व त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू नये याकरिता प्रशासनाने मियावाकी वन उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मियावाकी वन प्रकल्पात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करता येणार आहे. मियामाकी वनांसाठी शंभर टक्के सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. झुडूप, उपवृक्ष, मोठी पसरणारी झाडे असे वर्गीकरण केले जाते. याकरिता जागा, माती परीक्षण, लागवडीचे क्षेत्र, सूक्ष्म जीवांची माहिती महापालिका वृक्ष प्राधिकरण जमा करत आहे. मियावाकी हे जपानचे तंत्रज्ञान असून त्याचा प्रयोग वसईत होणार आहे. अगदी कमी जागेत लागवड करणे शक्य होणार असल्याने याकरिता निविदा प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. पाच ठिकाणी प्रत्येकी पाचशे चौमीटरचे जागा वृक्षांनी व्यापली जाणार आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा या उपक्रमांतर्गत हा प्रयोग करण्यात येणार आहे. कमी जागेत वृक्षलागवड केली जाणार असल्याने या घनवनात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळणार असून त्यामुळे नैसर्गिक वातावरण निर्मितीला देखील फायदा होणार आहे. वसई-विरार महापालिकेने विचारात घेतल्या या उपक्रमामुळे भविष्यात प्रदूषणाला रोखण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रात घनवने उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या प्रयोगामुळे विविध रोपांची लागवड कमी जागेत होणे शक्य आहे. जागा निश्चित केल्यावर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. - निशा महाजन, सहायक आयुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग. दृष्टिक्षेपात १ कोटी ७० लाख खर्च विविध प्रजातीची लागवड पाच जागा निश्चित करणार पर्यावरण पूरक उपक्रम प्रदूषणाला रोख

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top