भाजप डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
भाजप डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

भाजप डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

sakal_logo
By
भाजप डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा मुंबई, ता. ३१ : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दादर पूर्व येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयात शुक्रवारी (ता. २८) भाजप डॉक्टर सेलच्या कार्यक्रमात भाजप मुंबई वैद्यकीय आघाडीच्या ४० नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. भाजप मुंबई वैद्यकीय आघाडीच्या संयोजक डॉ. स्मिता रणजित काळे-बंडगर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये लोढा यांच्याकडे आरोग्य क्षेत्रातील विविध प्रश्न असलेले निवेदन देण्यात आले. भाजप मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा व मुंबई सचिव, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय सचिव, आघाडी प्रमुख प्रतीक कर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील विविध विभागांतील २०० डॉक्टरांनी भाजपच्या मुंबई डॉक्टर सेलमध्ये प्रवेश केला. याव्यतिरिक्त अनेक डॉक्टर लवकरच भाजप परिवारामध्ये सामील होण्याच्या मार्गावर असल्याचे डॉ. स्मिता काळे बंडगर यांनी सांगितले. मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top