भिवंडीत अवैध लाकडांनी भरलेला ट्रक जप्त, वनविभागाची धडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत अवैध लाकडांनी भरलेला ट्रक जप्त, वनविभागाची धडक कारवाई
भिवंडीत अवैध लाकडांनी भरलेला ट्रक जप्त, वनविभागाची धडक कारवाई

भिवंडीत अवैध लाकडांनी भरलेला ट्रक जप्त, वनविभागाची धडक कारवाई

sakal_logo
By
अवैध लाकडांनी भरलेला ट्रक जप्त पडघा, ता. ३१ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत चावे-भरे रस्त्यावर विनापरवाना लाकडाचे ओंडके घेऊन जाणाऱ्या ट्रकवर वन विभागाने जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी एक ट्रक लाकडाची ओंडकी भरून विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक ठाणे पडघा वनक्षेत्रपाल एस. बी. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चावे-भरे रस्त्यावर पाठलाग करून अवैध लाकडांनी भरलेला एक ट्रक ताब्यात घेण्यात आला. या ट्रकचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला असून, त्याचा शोध वनअधिकारी घेत आहेत. वनपाल विलास निकम, साहेबराव खरे, दिनेश माळी, वनरक्षक अमित कुलकर्णी, जमीर इनामदार, लेखापाल पंकज जाधव, महेंद्र भेरे, विकास उमतोल या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top