आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल
आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल

आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल

sakal_logo
By
आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल पनवेल, ता. ३१ (प्रतिनिधी) ः नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यात यावे या मागणीसाठी २४ जानेवारी रोजी पुकारलेल्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काम बंद आंदोलनाच्या संयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आंदोलनासाठी २७ गावांतील हजारो नागरिक एकत्र आले होते. आंदोलन स्थगित करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी ग्रामस्थ आणि सिडको यांच्यात बैठक आयोजित केली होती. परंतु चर्चा निष्फळ ठरली. आंदोलनासाठी १२०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top