सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात स्वच्छता जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात स्वच्छता जनजागृती
सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात स्वच्छता जनजागृती

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात स्वच्छता जनजागृती

sakal_logo
By
सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात स्वच्छता जनजागृती शिवडी (बातमीदार) : महापालिका बी विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात स्वच्छ भारत अभियानांतर्गत दोनदिवसीय स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती रॅली काढण्यात आली. स्थानक व्यवस्थापक विनायक शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली (ता. २९ व ३०) हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक व लगतचा सर्व परिसर, डोंगरी पोलिस ठाणे, डोंगरी मार्केट, बी आयटी चाळ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेल्वे प्रशासनाला सहकार्य करा, रेल्वे रुळावर कचरा टाकू नये; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी जनजागृती मेघाफोनद्वारे करण्यात आली. या मोहिमेत पालिकेच्या ५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तर डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शबाना शेख, पालिका बी विभाग कनिष्ठ अवेक्षक लीना चारणिया, माजी नगरसेवक ज्ञानराज निकम, हरिश्वर पाटील, मकरंद मोरे, शिरोमणी मोर्या आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top