संख्येत दीड लाखाने वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संख्येत दीड लाखाने वाढ
संख्येत दीड लाखाने वाढ

संख्येत दीड लाखाने वाढ

sakal_logo
By
मुंबईत मतदार कोटीच्या घरात संख्येत दीड लाखाने वाढ; निवडणूक निकाल घरबसल्या पाहता येणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३१ : मुंबईत २०१७ च्या निवडणुकीपेक्षा यंदा दीड लाख मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत मुंबईतील मतदारांची संख्या ९९ लाखांवर पोहचली आहे. विशेष बाब म्हणजे निवडणूक तारखेची घोषणा अद्याप झालेली नसली तरी, कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पाहाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईत २३६ प्रभागांच्या सीमांकनाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता निवडणूकपूर्व कामांना वेग आला आहे. कोविडच्या सावटाखाली निवडणूक होणार असल्याने यंदा अतिरिक्त नियोजनावर भर देण्यात येणार आहे. मुंबईत २०१७ च्या निवडणुकीत ९७ लाख ७५ हजार ५५९ मतदार होते; तर यंदा ही संख्या ९९ लाख २८ हजार १२५ वर पोहचली आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मतदार यादीत नाव नोंदणीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर व उपनगरात मिळून तब्बल एक लाख ५२ हजार ५६६ नवीन मतदारांची नोंद मतदार यादीत झाली आहे. सर्व निवडणूकपूर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. कोविड काळात निवडणुका होणार असल्याने मतमोजणी केंद्रांवर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी समाजमाध्यमांवर मत मोजणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या निवडणूक निकाल पाहता येणार आहे. मतदारनामा - २०१७ निवडणुकीत ९७ लाख ७५ हजार ५५९ मतदार - २०२२ मध्ये ही संख्या ९९ लाख २८ हजार १२५ - शहर व उपनगरात मिळून १ लाख ५२ हजार ५६६ नव मतदार - ५ जानेवारीपर्यंत १८ वर्षें पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदार यादीत नाव नोंद करण्याचे आवाहन. - मतदार म्हणून देहविक्री करणाऱ्यांची संख्या २,४०० आणि तृतीयपंथी ३,००० तर अपंग ७८६ मतदाननामा २०२२ मधील निवडणुकीसाठी ११ हजार मतदान केंद्रे, ६० हजार कर्मचारी. २०१७ च्या निवडणुकीत मुंबईत ८ हजार ५०० मतदान केंद्रे. कोरोना नियम आणि वाढलेल्या मतदारांमुळे मतदान केंद्रांत वाढ. अपंगांसाठी विशेष सुविधा -मतदानासाठी येणाऱ्या अपंगांना शक्‍य त्या ठिकाणी उद्‍वाहनांची सुविधा -तळमजल्यावर विशेष मतदान केंद्रे, स्वतंत्र रांगेची व्यवस्था कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आली आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे निवडणुकीदरम्यानच्या रॅली, मतमोजणीनंतरचा जल्लोष, मिरवणुका याबाबत त्यावेळीची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top