शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत
शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

sakal_logo
By
शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत मुंबई, ता. ३१ : राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आदी महाविद्यालयांसह विविध प्रकारच्या व्यावसायिक पदवी, पदविका अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करणे आणि जुन्या अर्जांचे नूतनीकरण करणे यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ‘महाडीबीटी’ प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. उच्च शिक्षणातील काही विषयातील प्रवेश प्रक्रिया आणि फेऱ्या अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा यासाठी विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिकसाठी अर्ज करणे, तसेच पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरणासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top