सामुहिक अत्याचार प्रकरणी आणखी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामुहिक अत्याचार प्रकरणी आणखी एकाला अटक
सामुहिक अत्याचार प्रकरणी आणखी एकाला अटक

सामुहिक अत्याचार प्रकरणी आणखी एकाला अटक

sakal_logo
By
फरारी आरोपींचा शोध सुरू अत्याचारप्रकरणी आणखी एकाला अटक अलिबाग, ता. ३१ (बातमीदार) : पेण तालुक्यातील अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या गुन्ह्यातील फरारी तीन आरोपींच्या शोधात पोलिस होते. त्यातील एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून मंगळवारी (ता. १) त्याला अलिबाग येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. वाशी परिसरातील सतरावर्षीय मुलीशी मैत्री करून तिच्याशी जवळीक साधून एकाने अत्याचार केला. त्यानंतर आरोपींच्या इतर साथीदारांनी त्या मुलीला धमकावून अत्याचार केले. ही घटना मे २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान घडली होती. या गुन्ह्यातील दहा जणांविरोधात वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली. सात जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर पथकाने तीन फरारी आरोपींचा शोध घेण्यास युद्धपातळीवर प्रयत्न केला. या प्रयत्नाला यश आले असून फरारी आरोपींपैकी एकाला सोमवारी (ता. ३१) अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top