मुंबईतील रुग्णसंख्या हजारच्या आत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील रुग्णसंख्या हजारच्या आत
मुंबईतील रुग्णसंख्या हजारच्या आत

मुंबईतील रुग्णसंख्या हजारच्या आत

sakal_logo
By
मुंबईतील रुग्णसंख्या हजारच्या आत सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३१ : मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट आता उतरणीला लागली असून आज (ता. ३१) शहरात एक हजाराहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. आज केवळ ९६० रुग्णांची नोंद झाली असून पॉझिटिव्हिटी दरातदेखील घट होत तो २.१ पर्यंत घसरला. दरम्यान, आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी तब्बल ८३५ (८७ टक्के) रुग्ण लक्षणविरहित आहेत. कोरोना नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने मुंबईतील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. आजच्या ९६० नव्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या १० लाख ४६ हजार ५९० झाली आहे. दरम्यान, मुंबईत नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून आज १ हजार ८३७ रुग्ण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत मुंबईत १० लाख १७ हजार २८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा ९,९०० पर्यंत कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत आज ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १६ हजार ६२३ वर पोहोचला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top