मुलुंडमध्ये अर्थप्रबोधन व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये अर्थप्रबोधन व्याख्यानमाला
मुलुंडमध्ये अर्थप्रबोधन व्याख्यानमाला

मुलुंडमध्ये अर्थप्रबोधन व्याख्यानमाला

sakal_logo
By
मुलुंडमध्ये अर्थप्रबोधन व्याख्यानमाला मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे प्रबोधन व्हावे, यासाठी महाराष्ट्र सेवा संघातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी एका अर्थप्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार का?’ या विषयावर अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस आणि ‘कररचनेतील बदल’ या विषयावर कर सल्लागार संजीव गोखले ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी ६.०० वाजता झूम मीटिंगद्वारे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सेवा संघातर्फे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने सेवा संघाच्या अर्थ विभागातर्फे गेली ११ वर्षे नियमितपणे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळी अर्थतज्ज्ञांना आमंत्रित केले जाते. परिणामी आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील कररचनेबद्दल नागरिकांना उपयुक्त माहिती मिळते. ...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top