पालघरमध्ये घरकुलाच्या चावीचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये घरकुलाच्या चावीचे वाटप
पालघरमध्ये घरकुलाच्या चावीचे वाटप

पालघरमध्ये घरकुलाच्या चावीचे वाटप

sakal_logo
By
पालघरमध्ये घरकुलाच्या चावीचे वाटप पालघर (बातमीदार) ः महाआवास अभियान टप्पा- २ व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत तीन हजार २१४ अपूर्ण घरकुलांपैकी पंतप्रधान आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत एकूण ८५१ घरकुले पूर्ण झालेली आहेत. पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश पोलिस परेड मैदान कोळगाव-पालघर येथे प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व घरकुलाची चावी हस्तांतरित करून पार पडला. उर्वरित सर्व ८४८ लाभार्थ्यांनाही त्यांचे तालुका व गाव स्तरावर गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करून प्रशस्तिपत्रक व घरकुलाची चावी वाटप करण्यात आली. यामध्ये डहाणू २९९, जव्हार ७५, मोखाडा ५७, पालघर ११८, तलासरी १००, वसई १७, विक्रमगड ८३, वाडा १०२ अशी एकूण ८५१ घरकुले बांधून पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक तुषार माळी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top