बजेटला निर्देशांकांचे थम्सअप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बजेटला निर्देशांकांचे थम्सअप
बजेटला निर्देशांकांचे थम्सअप

बजेटला निर्देशांकांचे थम्सअप

sakal_logo
By
बजेटला निर्देशांकांचे थम्सअप सेन्सेक्समध्ये ८४८ अंशांची वाढ मुंबई, ता. १ ः भारतीय शेअरबाजार निर्देशांकांनी आज सव्वा ते दीड टक्क्यांच्या आसपास वाढ दाखवून बजेटला चांगला प्रतिसाद दिला. सेन्सेक्स ८४८.४० अंश; तर निफ्टी २३७ अंशांनी वाढला. बजेटमुळे आज एकाच दिवसात सेन्सेक्स सुमारे १,१०० अंश वर-खाली झाला. अर्थसंकल्प सादर केल्यावर निर्देशांक हळूहळू वर गेले. नंतर दुपारी १ च्या सुमारास नफावसुलीमुळे ते चांगलेच खाली आले, पण त्या टप्प्यावरून पुन्हा खरेदी सुरू झाल्याने निर्देशांक पुन्हा वरच्या पातळीला गेले. आज सेन्सेक्स दुपारी ५७,७३७.६६ अंशांपर्यंत खाली घसरला होता; तर त्याचा दिवसभराचा उच्चांक ५९,०३२.७० अंश होता, पण तो दिवसअखेरीस ५८,८६२.५७ अंशांवर स्थिरावला. दुपारी १७,२४४.५५ अंशांपर्यंत घसरलेला निफ्टी बाजार बंद होताना १७,५७६.८५ अंशांवर स्थिरावला. सरकारी बँकांच्या भांडवलासाठी नवी तरतूद नसल्याने आज त्या बँकांचे शेअर पडले; तर सिगारेटवर नवा कर नसल्याने आयटीसीचा शेअर साडेतीन टक्के म्हणजे साडेसात रुपयांनी वाढून २२७ रुपयांवर स्थिरावला. आज निफ्टीच्या प्रमुख ५० शेअरपैकी ३५ शेअरचे भाव वाढले; तर सेन्सेक्सच्या मुख्य ३० शेअरपैकी सात शेअरचे भाव पडले. यातही मारुती ३७ रुपयांनी (बंद भाव ८,५५७ रु.) व महिंद्र आणि महिंद्र १४ रुपयांनी (८७०) पडला. उरलेल्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, एअरटेल, स्टेट बँक, पॉवरग्रीड हे शेअर फक्त एक ते साडेसहा रुपये असे किरकोळ पडले. ---- टाटा स्टील ८२ रुपये (१,१६७), सन फार्मा ५७ रुपये (८९२), इंडसइंड बँक ५० रुपये (९२२) व लार्सन अँड टुब्रो ८२ रुपये (१,९९१) व अल्ट्राटेक सिमेंट २९७ रुपये (७,५१२) वाढला. हे शेअर टक्केवारीच्या हिशेबात सर्वांत जास्त म्हणजे चार ते साडेसात टक्के वाढले. त्याखेरीज टायटन, एचसीएल टेक, आयसीआयसीआय (८०९), इन्फोसिस (१,७७२), टीसीएस (३,८००), विप्रो (५७६), डॉ. रेड्डीज लॅब (४,३११) या शेअरचे भावही वाढले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top