नगरसेवकांची धाकधुक वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेवकांची धाकधुक वाढली
नगरसेवकांची धाकधुक वाढली

नगरसेवकांची धाकधुक वाढली

sakal_logo
By
प्रभागांच्या पुनर्रचनेमुळे नगरसेवकांना चिंता शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून विजयाचा दावा सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करताना जुन्या प्रभागांचे अस्तित्वच संपले आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. मात्र, प्रभागांची संख्या वाढताना सर्वच प्रभागांचे विभाजन करून फेररचना करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेला एक प्रभाग प्रस्तावित दोन-तीन प्रभागांत विभागला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. पाच वर्षे नगरसेवकांनी ज्या प्रभागात काम केले, त्या प्रभागातील मतदार दोन-तीन प्रभागात विभागले गेले आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्याने सर्व मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. २०११ च्या जनगणनेवरूनही प्रभागरचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वीच्या आकडेवारीवरही प्रश्न निर्माण केले जात आहेत. मुंबईच्या राजकारणाचा सारीपाटच नव्याने मांडण्यात आल्याने नगरसेवकांची चिंता वाढली आहे. ..... पालिकेच्या २३६ प्रभागांच्या सीमांकनाचा आराखडा mcgm.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. ..... सर्व प्रभागांच्या सीमारेषांची फोडाफोडी करण्यात आली आहे. शिवसेनेने कितीही प्रयत्न केला, तरी भाजप मुंबई महापालिका काबीज करणारच. - प्रभाकर शिंदे, भाजप गटनेते .... प्रभाग फोडाफोडीची गरज शिवसेनेला कधीच वाटली नाही. प्रत्येक चाळ, इमारत, झोपडपट्टीत आमचे शिवसैनिक असून ते आणि मुंबईकर पुन्हा पालिकेवर भगवा फडकवतील. - किशोरी पेडणेकर, महापौर ..... २०१७ मध्ये भाजपने ४५ ते ५० प्रभागांची फोडाफोडी केली होती. ती या पुनर्रचनेत दुरुस्त झाली आहे. पुनर्रचनेमुळे काँग्रेसला मोठे यश मिळेल. आमच्या जागा अधिक वाढतील. - रवी राजा, विरोधी पक्षनेते

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top