Strike
StrikeSakal media

‘वाईन विक्री’विरोधात रिपब्लिकनचा मोर्चा; आठवले गटाच्या वतीने धरणे आंदोलन

मालाड : राज्य शासनाच्या मॉलमध्ये वाईन विक्रीस (wine selling) दिलेल्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पक्षाच्या (RPI) आठवले गटाच्या वतीने धरणे आंदोलन (strike) करण्यात आले. उत्तर मुंबई शाखेच्या वतीने मालवणी तलाठी कार्यालयाबाहेर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. राज्य सरकारविरोधात (Maharashtra Government) घोषणाबाजी करण्यात आली.

 Strike
ठाण्यात ९०० जणांवर उपचार सुरू; ११,६९६ रुग्ण होम क्वारंटाईन

मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे यांच्या नेतृत्वात व नेते प्रकाश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी यांना निवेदन देण्यात आले. तसेच बोरिवली तहसीलदार यांच्या कार्यालयातही निवेदन दिले. या वेळी शिष्टमंडळात चारकोप तालुका अध्यक्ष जगदीश झालटे, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप वावहले, मुंबई उपाध्यक्षा शोभा बोडके व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती सुनील गमरे यांनी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com