Strike
StrikeSakal media

पूरप्रश्नावर महाडमध्ये मोर्चा; सरकारी दिरंगाईचा निषेध करण्यासाठी बाजारपेठ बंद

महाड : पूर नियंत्रण उपाययोजनांसंदर्भात (Flood tragedy in mahad) सरकारकडून गती मिळत नसल्याचा आरोप करून महाड शहरातील नागरिक व पूरनिवारण समितीने शुक्रवारी (ता. ४) प्रांताधिकारी कार्यालयावर (strike at government office) मोर्चा काढण्यात आला. या वेळी सरकारी दिरंगाईचा निषेध करण्यासाठी महाड बाजारपेठ बंद (Mahad market closed) ठेवण्यात आली होती. पूरनिवारण समितीचे संयोजक नितीन पावले, दिलीप पार्टे, विकास गोगावले, विद्या देसाई, ममता मेहता, माधव मुंदडा, संजय मेहता, संदीप जाधव, मनोहर शिंदे, मनोज शेठ, मेहबूब कडवेकर सहभागी झाले होते.

 Strike
बीकॉम तृतीय वर्षाच्या सत्र ५ चा निकाल जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती

सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी सध्याची यंत्रणा अपुरी आहे. यामध्ये वाढ न केल्यास मुंबई व गोव्याकडे जाणारी वाहने महाड परिसरात रोखण्यात येतील. त्यानंतरच्या परिणामास सरकार जबाबदार राहील, असा इशारा समितीने दिला. नितीन पावले यांनी सांगितले की, पाच महिन्यांपासून सनदशीर मार्गाने सरकारबरोबर संवाद साधून महाडकर नागरिकांनी सहकार्य केले. आता केवळ उपयायोजनांसाठी १०० दिवस उरले असताना पाटबंधारे विभागाकडून अत्यावश्यक असलेली सुसज्ज यंत्रणा महाड परिसरामध्ये उतरविण्यात न आल्याने महाडकर नागरिकांवर पुन्हा एकदा धोक्याचे संकट घोंघावत असल्याचे स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com