भंडार्ली कचरा प्रकल्पाला विरोध कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडार्ली कचरा प्रकल्पाला विरोध कायम
भंडार्ली कचरा प्रकल्पाला विरोध कायम

भंडार्ली कचरा प्रकल्पाला विरोध कायम

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १३ ः दिव्याचे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी ठाणे पालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. १४ गावांतील भंडार्ली येथील जागा भाडेतत्त्वावर घेऊन येथे घनकचरा विल्हेवाट प्रकल्प राबविण्याचा ठराव पालिका प्रशासनाने केला आहे. या प्रकल्पाला भंडार्ली ग्रामस्थांचा कडाडून विरोध असून याविरोधात ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पाहून पालिका प्रशासनाने या प्रकल्पाचे काम सध्या बंद ठेवले आहे. याविषयी १४ गाव सर्वपक्षीय समितीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थ अद्यापही विरोधाच्याच भूमिकेवर ठाम असून सात दिवसांच्या आत ग्रामस्थ आपली भूमिका पुन्हा एकदा कळविणार आहेत.
१४ गावांतील भंडार्ली येथे कचरा प्रकल्प उभारणीच्या कामास पालिका प्रशासनाने सुरुवात करताच ग्रामस्थ आक्रमक होत रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या आक्रमकतेपुढे प्रशासनासही नमते घ्यावे लागले. शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर ग्रामस्थांना भेट दिली असून यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार असून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण यामुळे होणार नाही. तात्पुरत्या स्वरूपातील या प्रकल्पास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी शिंदे यांनी ग्रामस्थांना दिले आहे. यावर पुढील सात दिवसांत ग्रामस्थांची भूमिका कळविण्यात येईल, असे समितीने पालकमंत्र्यांना सांगितले आहे.
शनिवारी भंडार्ली येथे ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रमेश पाटील, भरत भोईर यांसह ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी एक वर्षासाठी नाही तर एका तासासाठी देखील भंडार्ली येथे ठाणे महापालिकेस कचरा टाकू दिला जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

ठाणे महापालिका हद्दीत जागा असताना तेथे छोटे मोठे प्रकल्प उभारून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाऊ शकते. पालकमंत्री हे पहिले विश्वासू होते. बोलल्याप्रमाणे ते करायचे. मात्र आता ते बालकमंत्री झाले असून बालहट्ट पुरविण्यासाठी ते कामे करीत आहेत.
- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण.

ग्रामस्थांचा डम्पिंगला विरोध तर आमचाही विरोध आहे. समाजाप्रती आमची बांधिलकी आहे.
- सुभाष भोईर, माजी आमदार.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top