ब्रह्मांड कट्टयावर प्राणिप्रेमींसाठी मार्गदर्शन शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रह्मांड कट्टयावर प्राणिप्रेमींसाठी मार्गदर्शन शिबिर
ब्रह्मांड कट्टयावर प्राणिप्रेमींसाठी मार्गदर्शन शिबिर

ब्रह्मांड कट्टयावर प्राणिप्रेमींसाठी मार्गदर्शन शिबिर

sakal_logo
By

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : ठाण्यातील ब्रह्मांड कट्टाअंतर्गत चालणाऱ्या ब्रह्मांड मॉर्निंग इव्हनिंग वॉकर्स क्लब या संस्थेतर्फे प्राणिप्रेमींसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. शिरीष देशपांडे आणि जोशीबाग अर्बन कॅम्पिंगच्या संचालिका धनश्री जोशी यांनी विविध विषयांवर प्राणिप्रेमींशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
ठाण्यातील अनेक प्राणीप्रेमींनी आपल्या पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन या शिबिराला हजेरी लावली होती. डॉ. देशपांडे यांनी पाळीव प्राण्यांचे आरोग्य आणि आहार यांची सखोल माहिती देत विविध समस्या आणि उपाययोजनांचे विवेचन केले. पशूंच्या अनेक आजारांवर प्रकाशझोत टाकत त्यावरील साधे सोपे उपाय सुचवले. निरोगी आयुष्यासाठी माणसांप्रमाणेच प्राण्यांसाठीही विहार म्हणजे आउटींग महत्त्वाचे आहे. कुटुंबासमवेत फिरण्याच्या आनंदावर त्यांचाही हक्क असतो. हाच धागा पकडत श्वानांसाठी खेळण्याची जागा, स्वीमिंग पूल, ट्रेकिंग, जंगल सफर, कॅम्पिंग या विविध सोयीसुविधा असलेल्या जोशीबाग अर्बन कॅम्पिंगबद्दल संचालिका धनश्री यांनी उपयुक्त माहिती दिली. तसेच डॉ. देशपांडे व धनश्री यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top