सोन्याच्या किंमती वाढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याच्या किंमती वाढल्या
सोन्याच्या किंमती वाढल्या

सोन्याच्या किंमती वाढल्या

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १५ ः सोन्याच्या किमती पुन्हा एकदा ५० हजारांच्या पार गेल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजीए) मंगळवारी सोन्याच्या किमती जाहीर केल्या. त्यानुसार, या किमतीत ६०६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने ५०,३५६ रुपये प्रतितोळा (१० ग्रॅम) झाले आहे.

फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळाली. या पंधरा दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत २,३८० रुपयांची वाढ झाली. १ फ्रेब्रुवारीला सोने ४७,९७६ रुपये प्रतितोळा होते, आता ही किमत ५०,३५६ प्रतितोळा झाली आहे; तर चांदीची किंमत ६४,४४० प्रतिकिलो झाली आहे. म्हणजे चांदीच्या किमतीत ३,४७१ रुपये वाढ झाली आहे.

यावर्षी सोन्याची किंमत ५५ हजार प्रतितोळा होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, देश व जगभरात महागाई वाढत आहे. रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान वाढत असलेल्या ताणतणावाचा परिणाम महागाईवर होत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमतीतही वाढ होत असून, ८० ते ८५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत चांदीची किंमत जाऊ शकते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top