
कोरोनाबळी अनुदान कागदावरच
मुंबई, ता. १८ ः कोरोना बळींच्या नातेवाईकांना ५० हजार सानुग्रह अनुदान देण्याची योजना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेने केवळ कागदावरच दाखवली; परंतु प्रत्यक्षात नातेवाईकांच्या खात्यात रक्कम जमा झालीच नाही, हा निव्वळ निलाजरेपणाचा कारभार असल्याची टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
राज्य शासनाने कोरोना बळींच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह मदत करण्याची घोषणा केली. तसेच मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार असल्याचेही शासनाकडून सांगण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे ही योजना कोरोना मृतांच्या नातेवाईकांसाठी क्रूर थट्टा ठरली असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे. कोरोना बळींच्या नातेवाईकांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्यात यावी, तसेच नातेवाईकांना मनस्ताप झाल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..