श्रीकाशी विश्वनाथ संस्थेचा सुवर्णमहोत्सव उत्सहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीकाशी विश्वनाथ संस्थेचा सुवर्णमहोत्सव उत्सहात
श्रीकाशी विश्वनाथ संस्थेचा सुवर्णमहोत्सव उत्सहात

श्रीकाशी विश्वनाथ संस्थेचा सुवर्णमहोत्सव उत्सहात

sakal_logo
By

मुंबई ः भांडुप पूर्व येथील शिवकृपानगर येथे कार्यरत असलेल्या श्रीकाशी विश्वनाथ सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून या निमित्ताने मंगळवारी १ मार्चला महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमापूर्वी १९ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत बाबा कदम यांच्या सौजन्याने चंद्रभागा कदम यांच्या स्मरणार्थ ह. भ. प. शिवणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सत्यनारायण महापूजेसोबतच मंगळवारी अभिषेकाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय रात्री ९ वाजता परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळ तळगावकर आणि सचिव अंकुश आदक यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top