
अधिकाधिक वाचनातून अनुभवविश्व समृद्ध
विरार, ता. २६ (बातमीदार) ः मराठी भाषा समृद्ध आहे. तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. साहित्यकृतीचे वाचन केले पाहिजे. आपण जेवढे अधिकाधिक वाचन करू तेवढे आपले अनुभवविश्व समृद्ध आणि विकसित होते. महाविद्यालयीन जीवन भाषिक विकास समृद्ध करण्याचे वय आहे. या वयात आपण जेवढे जास्तीत जास्त वाचन करू तेवढे आपले विचारांचे विश्व समृद्ध होईल, असे मौलिक विचार प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांनी मांडले. मराठी भाषा दिनानिमित्त संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात विभुते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सॅबी परेरा आणि कवयित्री अनुपमा उजगरे आदी उपस्थित होते.
विभुते म्हणाले की, मातृभाषेतून इतर भाषिकांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यामुळे स्वतःची भाषा विकसित होते. तोच मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा ठरू शकतो.
कवयित्री अनुपमा उजगरे यांनी कवितेविषयीचे अनुभव कथन केले. सॅबी परेरा यांनीही भाषेविषयी त्यांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे डॉ. दिनेश काळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा इरकर यांनी केले. या प्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ. रामदास तोंडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अनिल सोनवणे, डॉ. नंदकुमार झांबरे, डॉ. गुणवंत गडबडे, डॉ. चैतन्य वीर, डॉ. तुषार राऊत, प्रा. सुजाता कुलकर्णी, प्रा. अल्बिना जोशी, प्रा. हायश्चिंथा, प्रा. प्रिया फरेल, प्रा. फेलिक्स डिसोजा, दीप्ती सांदन आदी उपस्थित होते.
...
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..