
कांजूरमार्गमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन
शिवडी, ता. २६ (बातमीदार) ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी (ता. २५) कांजूरमार्ग - भांडुप पूर्व येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय ते बंजरग हॉटेल दरम्यान रॅली काढून घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. ईशान्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, ईशान्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अजितकुमार पिसाळ, म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम, जीवन कांबळे, कांचन किर्लोस्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..