सेप्टिक टॅंक स्फोट प्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेप्टिक टॅंक स्फोट प्रकरणी गुन्हा
सेप्टिक टॅंक स्फोट प्रकरणी गुन्हा

सेप्टिक टॅंक स्फोट प्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) ः भिवंडी महापालिका हद्दीत चव्हाण कॉलनी येथे सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टिक टॅंकमध्ये शनिवारी (ता. २५) सकाळी ९.३० वाजता स्फोट झाला होता. या दुर्घटनेस जबाबदार धरत शौचालयाच्या निगा व दुरुस्तीचे काम पाहणाऱ्या मानव सेवा संस्थेसह संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी येथील या दुर्घटनेत इब्राहीम मोहम्मद सत्तार शेख (७४) या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता; तर जमाल अहमद वली अहमद अन्सारी व आसीफ कासीम शेख असे दोघे जण जखमी झाले. याप्रकरणी शांतिनगर पोलिस ठाण्यात जखमी जमाल अहमदवली अ. अन्सारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक शौचालयाच्या चेंबरमधील मैला सफाई करणे, सुरक्षितता पाहणे, शौचालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मानव सेवा संस्थेचे ठेकेदार रवी दासारी यांची; तर त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाची असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोषी ठरवत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बडाख करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top