एसटी संपकरी कॅबिनेट मंत्र्यांच्या दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी संपकरी कॅबिनेट मंत्र्यांच्या दारी
एसटी संपकरी कॅबिनेट मंत्र्यांच्या दारी

एसटी संपकरी कॅबिनेट मंत्र्यांच्या दारी

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ ः एसटीच्या विलीनीकरणासंदर्भात उच्च न्यायालयात गेल्या २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सरकारने अहवाल खुला करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्‍यक असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे शासनाच्या तीन सदस्यीय अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. त्यामुळे एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी कॅबिनेट मंत्र्यांचे घर गाठून त्यांना विलीनीकरणाच्या मागणीसाठी साकडे घातले आहे. राज्यभरातील कॅबिनेट मंत्र्यांच्या घरी जाऊन संपकऱ्यांकडून त्यांना विलीनीकरणाचे निवेदन दिले जात आहे.
चार महिन्यांहून अधिक काळ राज्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचे एसटीच्या विलीनीकरणाच्या एकमेव मागणीसाठी संप सुरू आहे. यादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी वेतनवाढ, भत्त्यांमध्ये वाढ केली आहे. त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप ताणून धरला असून, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची ताठर भूमिका घेतली असून, संपामुळे एसटी कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे ५० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचा दावासुद्धा संपकऱ्यांकडून केला जात आहे.
एसटी प्रशासनाने संपकऱ्यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट आणि अवमान याचिकेच्या सुनावणीदरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या लक्षात घेऊन न्यायालयाने तीन सदस्यीय समिती गठीत करून १२ आठवड्यांत विलीनीकरणासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. मात्र, १२ आठवडे होऊनही अद्याप अहवालाची स्पष्टता होत नसल्याने संपकऱ्यांनी मंत्र्यांचे दार ठोठावले आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..