दोन बसमध्ये २५० विद्यार्थ्यांना कोंबले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन बसमध्ये २५० विद्यार्थ्यांना कोंबले
दोन बसमध्ये २५० विद्यार्थ्यांना कोंबले

दोन बसमध्ये २५० विद्यार्थ्यांना कोंबले

sakal_logo
By

मोखाडा, ता. २८ (बातमीदार) : आदिवासी विकास विभागामार्फत इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण घेत असलेल्या २५० विद्यार्थ्यांना फक्त दोन बसमध्ये कोंबून नेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब जिल्हा परिषद सदस्य सारिका निकम आणि प्रकाश निकम यांना समजताच त्यांनी विद्यार्थी व पालकांना घेऊन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात घोषणा देत आंदोलन केले. अखेर सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुशी सिंग यांनी विद्यार्थ्यांना पुरेशा बसमधून सुरक्षितपणे नेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सरकारने नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळण्यासाठी योजना सुरू केली आहे. जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत स्कॉलर फाउंडेशन, पाचगणी येथील इंग्रजी शाळेत २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी केवळ २ बसचे नियोजन शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आले होते. जव्हारहून पाचगणी हे अंतर जवळपास ३६५ किमी आहे. ही बाब पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य सारिका व प्रकाश निकम या दाम्पत्याला समजली. त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. आंदोलनाच्या दणक्याने आदिवासी विकास विभागाचे प्रशासन ताळ्यावर आले. या वेळी प्रशासनाने दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देत विद्यार्थ्यांना अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.


सदर शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व दादाजी भुसे यांना तक्रार केली आहे. शिवाय या शालेय व्यवस्थापनाने आदिवासी विद्यार्थ्यांना बेजबाबदार व अमानुषपणाची वागणूक दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी केली आहे.
- प्रकाश निकम, सदस्य, पालघर जिल्हा परिषद.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..