
पडघा महाविद्यालयात ''सैन्य दलातील संधी'' विषयावर मार्गदर्शन
पडघा, ता. १ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील छत्रपती शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालय पडघा येथे ‘भारतीय सैन्य दलातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शनिवारी महाविद्यालयातील तरुणांना सैन्यदलात कारकीर्द घडवण्यासाठी माहिती असावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘भारतीय सैन्य दलातील संधी’ या विषयावर निवृत्त मेजर विवेक बोडस यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाच्या सृजन या वार्षिक अंकाचे प्रकाशन मेजर बोडस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रभारी प्राचार्या सावित्री क्रांतिकर, प्रा. ज्योती भोई, संध्या शिरोडकर, कीर्ती वर्मा, दीपक पोंक्षे, मयूर पाटील महाविद्यालयाचे व्यवस्थापक जयंत सोनटक्के, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी सुजाता खंबायत उपस्थित होते.