प्रेमसंबंध नाकारल्याने महिलेवर कोयत्याने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमसंबंध नाकारल्याने महिलेवर कोयत्याने हल्ला
प्रेमसंबंध नाकारल्याने महिलेवर कोयत्याने हल्ला

प्रेमसंबंध नाकारल्याने महिलेवर कोयत्याने हल्ला

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : मुले मोठी झाल्याने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने विधवा महिलेवर प्रियकराने कोयत्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ मध्ये साई वसण शाह दरबाराजवळ विधवा महिलेचा फूल-हार विक्रीचा व्यवसाय असून तिच्या दुकानात ५५ वर्षीय रघुनाथ कृष्णा भोईर हा काम करतो. त्यांचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर ते काही दिवस एकत्र राहिले; मात्र महिलेची मुले मोठी झाल्याने त्यांच्यात खटके उडत होते. महिलेने रघुनाथला वेगळे राहण्यास सांगितले होते; मात्र तो तिला सोडण्यास तयार नव्हता.

हिललाईन पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत रघुनाथला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी सांगितले.

पैशांची मागणी
रघुनाथ वेगळा होत नसल्याने या दोघांतील वाद गेल्या काही दिवसांपासून वाढत गेले. अखेर तुला सोडायचे असेल, तर मला पाच लाख रुपये दे, असे सांगत ब्लॅकमेलिंग करू लागला. त्यास महिलेने नकार दिल्याने त्यांच्यातील वाद वाढत गेले. अखेर सोमवारी दुकानात बसलेल्या महिलेवर रघुनाथने कोयत्याने हल्ला करून पळ काढला. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.