नवी मुंबई APMC त हापूसची आवक वाढली, जाणून घ्या दर

नवी मुंबई APMC त हापूसची आवक वाढली, जाणून घ्या दर

वाशी, ता. २ (बातमीदार) : एपीएमसीतील फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधून ४,५०० पेट्या दाखल झाल्या आहेत. एपीएमसीत डिसेंबरपासून तुरळक प्रमाणात हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. (Navi Mumbai APMC)

यंदा हापूसचे उत्पादन जास्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हापूसला मोहोर येण्याची वेळ आणि अवकाळी पावसामुळे मोहोर गळून पडला होता. तर शेतकऱ्यांचा औषध फवारणी खर्च दुपटीने वाढला होता. त्यामुळे हापूस आंब्याच्या सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसल्याने उत्पादनात घट होईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. (alphonso mango rates per dozen)
साधारणत: मार्च महिन्यात हापूसचा खरा हंगाम सुरू होतो. मात्र सुरुवातीच्या पावसाने यावेळी हंगामाला उशिरा सुरुवात होईल. काही दिवसांपासून बाजारात एक दिवसआड ७० ते ८० पेट्या दाखल होत होत्या. मंगळवारी बाजारात ६ ते ७ डझनच्या ४५०० पेट्या दाखल झाल्या असून, २ ते ६ हजार रुपये बाजारभाव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com